Samaj-Kalyan-Hostel-(maharashtra)-application-2022
Samaj Kalyan Hostel (maharashtra) application
समाज कल्याण हॉस्टेल म्हणजेच Government Hostel 2022 करिता अर्ज करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. गवर्नमेंट हॉस्टेल करिता अर्ज करण्याची प्रक्रिया ही 2022 करिता ऑफलाईन पद्धतीने सुरू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण हॉस्टेल मध्ये अर्ज करायचा असेल त्यांना संबंधित हॉस्टेल मध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. त्यामुळे पात्र सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करून घ्यावे.
समाज कल्याण हॉस्टेल योजना प्रवेश प्रक्रिया:-
अर्ज केल्या नंतर लिस्ट लागत असते, जर त्या लिस्ट मध्ये तुमचे नाव आल्यास कागदपत्रे हॉस्टेल मध्ये देऊन एडमिशन करून घ्यावी. त्या नंतर प्रवेश निश्चित होईल.
समाज कल्याण हॉस्टेल एकूण किती लिस्ट लागतात?:-
समाज कल्याण हॉस्टेल मध्ये सहसा तीन लिस्ट लागत असतात.
समाज कल्याण हॉस्टेल मध्ये प्रवेश कोणत्या विद्यार्थ्यांना मिळतो
Samaj kalyan विभागाच्या Government hostel मध्ये प्रवेश हा, शालेय विभाग म्हणजे 8 वी ते 10 वी तसेच कनिष्ठ महाविद्यालय वर्ग 11 वा. आणि वरिष्ठ महाविद्यालय बी ए, बी. कॉम, बी एस सी इत्यादी तसेच वरिष्ठ महाविद्यालय व्यवसायिक विभाग कृषी , डी फॉर्म, बी फॉर्म इत्यादी. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळविता येतो. समाज कल्याण शासकीय वसतिगृह महाराष्ट्र
समाज कल्याण हॉस्टेल (government hostel maharashtra) मध्ये प्रवेश हा SC,ST,OBC तसेच VJ आणि NT-A, NT-B, NT-C, NT-D या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या Government Hostel मध्ये प्रवेश मिळविता येत असतो.
समाज कल्याण हॉस्टेल मध्ये अपंग तसेच अनाथ विद्यार्थ्यांना त्यांच्या करिता स्पेशल जागा राखीव असतात.
समाज कल्याण हॉस्टेल Government Hostel Maharashtra आवश्यक कागदपत्रे
Samaj Kalyan Hostel Government Hostel Maharashtra
Required Documents
- मार्कशीट
- टीसी
- जातीचा दाखला
- उत्पन्न दाखला
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- अधिवास प्रमाणपत्र
- गॅप सर्टिफिकेट( जर शिक्षणात खंड पडल्यास )
- अपंग प्रमाणपत्र ( जर असल्यास)
- चरित्र प्रमाणपत्र ( सरपंच किंवा पोलिस पाटील यांच्या स्वाक्षरीने)
समाज कल्याण शासकीय वसतिगृहात मिळणाऱ्या सुविधा
Facilities available in Samaj Kalyan Government Hostel
- आकर्षक इमारत
- राहण्याची उत्तम व्यवस्था
- प्रवेशित विद्यार्था करीता मोफत व सकस आहारा सहीत जेवणची व्यवस्था
- मोफत सर्व शैक्षणिक स्टेशनरी साहीत्य
- दरमहा निर्वाह भत्ता
- स्पर्धा परीक्षा पुस्तके
- ग्रंथालयीन पुस्तके
- बेड बिछाना साहीत्य
- मनोरंजनाची सुविधा
- अभ्यासिका
- क्रिडा साहीत्य (सर्व प्रकारचे ) व व्यायाम साहीत्य (जिम)
0 Comments