नियमित कर्जमाफी 50,000 अनुदान बँक खात्यात, नवीन GR आला | Niyamit Karjmafi Anudan Yojana

 Niyamit Karjmafi Anudan Yojana

Niyamit Karjmafi Anudan Yojana
Niyamit Karjmafi Anudan Yojana

प्रस्तावना -:
सन २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या
शेतकऱ्यांना रु. ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय
तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या
शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देणेबाबत दिनांक
२७.०७.२०२२ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

Digitlshetakari.in

त्याअनुसार सहकार विभागाच्या संदर्भ
क्र. १ दिनांक २९.०७.२०२२ च्या शासन निर्णयान्वये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९
अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तसेच, सदर योजनेसाठी
सहकार विभागाच्या संदर्भाधीन क्र.२ दि.०२.०८.२०२२ च्या शासन निर्णयान्वये नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्यात
आले आहे.
 

सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात रु. ४७००.०० कोटी इतकी
रक्कम वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक ३ दिनांक २९.०८.२०२२ च्या परिपत्रकान्वये तसेच सहकार विभागाच्या
संदर्भ क्रमांक ४ दिनांक ३०.०८.२०२२ च्या शासन निर्णयान्वये पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आली आहे.
त्याअनुसार याबाबत सहकार आयुक्‍त कार्यालयाच्या संदर्भाधीन दिनांक ०१.०८.२०२२ च्या पत्राद्वारे प्राप्त
प्रस्तावानुसार निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
 

शासन निर्णय :-
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वदस्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या
योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु. २३५०.०० कोटी (रु. दोन हजार तिनशे पन्नास कोटी फक्त) इतकी रक्‍कम
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर)

 

Digitlshetakari.in



Post a Comment

1 Comments