पोखरा अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य पालन योजना 2022
pocra yojana maharashtra Matsyapalan anudan 2022 |
हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून भविष्यातील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदलाविषयी कृती आराखडा मध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून मोठ्या दुष्काळास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठ्यांवर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहेत. परिणामी शेती मधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच त्यांना नदीच्या खोऱ्यातील भूभाग हा निसर्ग हाच शार्प असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.
राज्यातील कोरडवाहू शेती क्षेत्रात मध्ये संरक्षित सिंचनाकरिता प्रामुख्याने विहीर, पाझर तलाव, गावतळी, वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे याद्वारे पाणी उपलब्ध करून घेतले जाते. सिंचन बरोबरच शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्य शेती करण्यासाठी वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने जागतिक बँक अर्थ सहित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत एकात्मिक शेती पद्धती या घटकांतर्गत शेततळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्य पालन हा उपघटक वैयक्तिक लाभाच्या घटकांमध्ये सामाविष्ट केलेला आहे.
पोखरा योजनेत योजनेतील गोड्या पाण्यातील मत्स्य पालन या योजनेचे उद्दिष्ट –
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामानबदलामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना पूर्णतः सक्षम बनवणे.
संरक्षित सिंचन व बरोबरच जोडधंदा म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्यशेती द्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे या योजनेमागचा चे उद्दिष्ट आहे.
उपलब्ध नैसर्गिक साधनांचा प्रत्यक्ष उत्पादनासाठी कार्यक्षमपणे वापर करून मत्स्यशेती विकसित करणे आणि शेतकऱ्यांचे रोजगार वाढविणे.
मत्स पालन योजनेतील लाभार्थी पात्रता –
प्रकल्पांतर्गत निवड केलेला गाव पातळीच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले, अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी, अनुसूचित जाती/जमाती , महिला, दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
सिंचनासाठी सामुदायिक शेततळे किंवा वैयक्तिक शेततळे उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.
मत्स्य शेती अंतर्गत घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार नाही.
शेतकऱ्याकडे पाण्याचा साठा हा कमीत कमी ८ ते १० महिने असणे आवश्यक असणार आहे.
मत्स्य पालन तलाव करण्यासाठी हे शक्यतो आयताकृती असावेत. ज्यामुळे मासे पकडण्यासाठी जाळी फिरवणे सोयीचे जाते.
तलावाची खोली किमान १.२ मीटर ते २ मीटर असणे आवश्यक आहे.
गोड्या पाण्यातील मत्स पालन योजनेअंतर्गत अनुदान/ अर्थसहाय्य –
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत एकात्मिक शेती पद्धती या घटकांतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य पालन या उपघटकांचा साठी प्रतिहेक्टर अपेक्षित खर्चाचा तपशील हा खालील तक्त्यात देण्यात आला आहे. सदर तपशील आवरून शेततळ्याच्या आकारानुसार येणाऱ्या एकूण खर्चाचा रकमेच्या ५० टक्के अर्थसाहाय्य शेतकऱ्याला देय राहील.
गोड्या पाण्यातील मत्स पालन योजनेची कार्यपद्धती –
शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी व शेतकऱ्याने अपलोड केलेले कागदपत्रांची छाननी करून अर्जाची अत्यल्प व अल्पभूधारक अशा प्रवर्गनिहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग महिला, शेतकरी व इतर सर्वसाधारण शेतकरी या प्राधान्यक्रमाने वर्गवारी केली जाते.
सर्व ऑनलाईन अर्ज ग्राम कृषी संजीवनी समितीसमोर मान्यतेसाठी सादर केले जातात. तेथून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर असा ठराव संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतो.
शेतकऱ्यांसाठी योजनेच्या अटी व शर्ती तसेच घटकांबाबत चे आर्थिक व तांत्रिक निकष समजून सांगितले जातात.
पात्र लाभार्थ्यांना पूर्वसंमती बाबत अवगत केले जाते.
मत्स्यबीज खरेदीबाबत –
लाभार्थीने पूर्वसंमती मिळाल्यानंतर या घटकाची अंमलबजावणी करावी. मत्स्यबीज खरेदी लाभार्थ्याने मत्स्य विकास विभागाच्या शासकीय मत्स्यबीज केंद्राकडून करणे आवश्यक असणार आहे. बीज शिल्लक नसल्यास, इतर खाजगी मत्स्यबीज केंद्राकडून त्यांचे जबाबदारीवर खरेदी करावे. परंतु लाभार्थ्याला शासकीय दरानुसार मत्स्यबीज खरेदीसाठी अनुदान देय असणार आहे.
अनुदान कसे मिळणार आणि त्यासाठी काय करावे लागणार?
लाभार्थीने ऑनलाईन अनुदान मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे करावी. सोबत मत्स्यबीज खाद्य व खते इत्यादी निविष्ठांची खरेदी देयकांच्या मूळ प्रति ऑनलाइन अपलोड करावे लागणार आहेत. त्यानंतर अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा करण्यात येईल. मत्सपालना बाबत लाभार्थ्यासाठी प्रशिक्षण शासकीय खर्चाने करण्यात येईल.
गोड्या पाण्यातील मत्स पालन योजनेसाठी लाभ घेण्यासाठी किती टक्के अर्थसहाय्य असणार आहे ?
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प गावातील अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ७५ टक्के अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.
दोन ते पाच हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६५% अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे –
७/१२ प्रमाणपत्र
८-अ प्रमाणपत्र
अर्ज कुठे करावा –
इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
0 Comments